Join us

अभिनेत्री दिव्या भटनागर यांचे कोरोनामुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:06 IST

अनेक मालिकांमध्ये साकारल्या उत्तम भूमिकालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यह रिश्ता क्या कहलाता है या प्रसिद्ध मालिकेतील गुलाबो ...

अनेक मालिकांमध्ये साकारल्या उत्तम भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : यह रिश्ता क्या कहलाता है या प्रसिद्ध मालिकेतील गुलाबो ही भूमिका गाजविणारी अभिनेत्री दिव्या भटनागर (३६ वर्षे) यांचे कोरोना संसर्ग व हृदयविकाराच्या झटक्यामुळे सोमवारी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते.

दिव्या भटनागर यांना सात दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. दिव्या यांची प्रकृती बरी नाही असे कळल्यावर त्यांची आई व भाऊ हे दिल्लीहून तातडीने मुंबईत दाखल झाले होते.

दिव्या भटनागर यांना अभिनेत्री शिल्पा शिरोडकर, करण मेहरा आदी कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिल्पा शिरोडकर यांनी म्हटले आहे की, दिव्या भटनागरच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. ती एक उत्तम अभिनेत्री होती.

दिव्या भटनागर हिचे निधन झाले आहे यावर माझा विश्वासच बसत नाही. ती माझी अतिशय उत्तम सहकारी व मैत्रीण होती असे अभिनेत्री निधी उत्तम यांनी सांगितले. दिव्या भटनागर यांनी उडान, सिलसिला प्यार का, ससुराल गेंदा फूल, सावरे सबके सपने प्रीतो आदी मालिकांतून केलेल्या भूमिकाही गाजल्या.