Join us  

युवा कलावंताला सुक्या म्हावऱ्याची साथ...!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:51 AM

आर्थिक पेचामुळे निवडला विक्रीचा मार्ग; नाट्यसृष्टीवर दाटले अनिश्चिततेचे मळभ

- राज चिंचणकरमुंबई : गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे नाटकांवर पडदा पडला आहे. नाट्यगृहे पुन्हा केव्हा सुरू होणार हे माहीत नाही. नाट्यसृष्टीवर सध्या अनिश्चिततेचे मळभ दाटले आहे. अशावेळी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेकांवर विविध मार्ग चोखाळण्याची वेळ आली आहे. यातलाच एक युवा कलावंत, रोहन पेडणेकर याला सध्याच्या पडत्या काळात थेट सुक्या म्हावºयाची साथ लाभली आहे.रोहन मूळचा वेंगुर्ल्याचा असल्याने, त्याच्यासाठी मासे नवीन नाहीत. बालपणी रोहन जोगेश्वरीला राहत असताना, तिथे भरणाºया मालवणी जत्रेत तो वडिलांसोबत असायचा आणि यातून त्याचा माशांचा अभ्यास होत गेला. त्याचे वडील हा व्यवसाय करायचे आणि रोहनने त्यांचा हा व्यवसाय सध्या नव्याने सुरु केला आहे. नाटकातले त्याचे काही मित्रही त्याच्या सोबतीला आहेत. गेले तीन महिने रोहन घरी बसून आहे. या काळात त्याने एक सिनेमा लिहिला; त्याचे अर्धेच पैसे त्याला मिळाले. इतरही काही जणांकडून पैसे येणे बाकी आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी रोहनने त्याच्या परिचयाच्या, सुक्या म्हावºयाकडे मोर्चा वळवला आहे.रोहनने आतापर्यंत १२ व्यावसायिक; तसेच ६ प्रायोगिक नाटके केली आहेत. काही मालिकांतून त्याने भूमिका साकारल्या आहेत. अनेक एकांकिकाही त्याने बसवल्या आहेत. यातून बरीच पारितोषिकेही त्याला मिळाली आहेत. मात्र सध्या त्याला उत्पन्नाचे साधन नाही. अशा कठीण स्थितीला सामोरे जात, आता सुक्या माशांचा लघुउद्योग सुरू करून मी माझ्या कुटुंबाला आधार देत आहे, असे रोहन याने ‘लोकमत’ला सांगितले.जिद्दीने लढाई लढायची आहेउद्या नाट्यसृष्टी सुरु होईल; पण काम मिळेल याची शाश्वती कोण देणार? वास्तविक, मला अनेक जण आर्थिक मदत करू शकतील. पण मला मेहनतीने पैसे कमवायचे आहेत. लाजायचे नाही आणि हार मानायची नाही; हे मला नाट्यसृष्टीनेच शिकवले आहे. त्यामुळे या काळात आपण जिद्दीने लढाई लढली पाहिजे. अशा कठीण काळात जगून दाखवतो, तो खरा योद्धा असतो. आपण सगळे योद्धे आहोत; त्यामुळे आपण लढले पाहिजे.- रोहन पेडणेकर, अभिनेता