Join us  

अभिनेता पुष्कर जोग याच्या पोस्टमुळे वाद, कारवाईची मागणी

By जयंत होवाळ | Published: January 29, 2024 7:44 PM

बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने मागणी केली आहे.

मुंबई : ''मराठा आरक्षण सर्वेक्षणाअंतर्गत जात विचारणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या जागी पुरुष कर्मचारी असते, तर त्यांना दोन लाथा घातल्या असत्या'', अशी पोस्ट सोशल मीडियावर केल्याप्रकरणी मराठी अभिनेते पुष्कर जोग यांच्यावर मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य मागासवर्गीय आयोगाने कारवाई करावी अशी मागणी, बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने केली आहे.

मराठा आरक्षण सर्वेक्षण करताना सर्वेक्षण करणारे कर्मचारी राज्य मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या ऍप नुसार माहिती विचारतात. त्यानुसार जात विचारली जाते. जात विचारली म्हणून.'' पुरुष कर्मचारी असता तर दोन लाथा घातल्या असत्या'',  हे जोग यांचे विधान गंभीर आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी युनियनने केली आहे. यासंदर्भात लोकमत प्रतिनिधीने  जोग यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी  संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मोबाईल कॉलला प्रतिसाद दिला नाही. मेसेज आणि व्हाट्स ऍपलाही प्रतिसाद दिला नाही.  

- पोस्ट हटवली ?जोग यांनी 'एक्स' वर पोस्ट केल्याचा दावा युनियनने केला. मात्र जोग यांच्या 'एक्स' खात्यावर ती पोस्ट दिसली नाही. प्रकरण अंगाशी येणार हे दिसताच जोग यांनी पोस्ट हटवली असावी, असे युनियनचे कार्यध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष म्हणाले. 

टॅग्स :पुष्कर जोगमराठा आरक्षण