Join us

अभिनेता फरहान अख्तर आणि अधुना होणार विभक्त

By admin | Updated: January 21, 2016 22:13 IST

अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची पत्नी हेअरस्टाईलिट्स अधुना या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. फरहान अख्तर आणि अधुना यांच्या लग्नाला १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची पत्नी हेअरस्टाईलिट्स अधुना या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. फरहान अख्तर आणि अधुना यांच्या लग्नाला १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एकमेकांशी चर्चा करुन आणि सौहार्दपूर्ण वातावरणात विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 
फरहान अख्तर आणि अधुनाला दोन मुले आहेत. शाक्य आणि अकिरा अशी त्यांची नावे आहेत. आम्ही एकमेकांशी चर्चा करुन आणि सौहार्दपूर्ण वातावरणात वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मुलांना आमचे प्राधान्य असेल, कारण ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत. तसेच, पालक म्हणून आमची जबाबदारी असल्याचे यावेळी या दोघांनी सांगितले.    
फरहान अख्तर आणि अधुना यांनी २००० मध्ये लग्न केले होते, त्यावेळी फरहान अख्तर 'दिल चाहता है' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे वळला होता.