Join us

अभिनेता एजाज खानची जामिनावर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 01:59 IST

वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर

मुंबई : फेसबुक लाइव्हवर आक्षेपार्ह व असभ्य भाषेचा वापर केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता एजाज खान याचा शुक्रवारी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला.काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एजाज खानने एक लाइव्ह व्हिडीओ केला होता. या व्हीडिओमध्ये त्याने द्वेषमूलक भाषेचा वापर केला आहे. ‘कायम मुस्लिमांनाच दोषी का धरण्यात येते?’ असा सवालही त्याने केला होता. तसेच त्याने राजकीय पक्ष, राजकीय नेते आणि पत्रकार यांच्याविरुद्ध असभ्य भाषा वापरली.सारे जग कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करत असताना खान याने या सर्वांना कोरोनाची लागण होण्यासाठी प्रार्थना केली. या प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने एजाज खान याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.पोलिसांनी एजाज याच्यावर आयपीसी कलम १५३ (ए) ( धार्मिक तेढ, जन्मस्थळ, भाषा इत्यादी आधारे दोन समाजांत तेढ निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा नोंदविला. गेल्यावर्षी खान याला अशाचप्रकारे आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला होता.