मुंबई : सिद्धार्थनगर गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसनाच्या कामाबाबत चुकीची माहिती देणा-या म्हाडाच्या अधिका-यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.पत्राचाळ आणि गोरेगाव मिठानगर वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अनेक वर्षांपासून विकासकांनी घराचे बांधकाम रखडवले आहे. वर्षभरापासून चाळीतील रहिवाशांचे घरभाडे विकासकाने दिलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून, दोषी अधिकाºयांवर कडक कारवाई करावी. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर आदी उपस्थित होते.
‘त्या’ अधिका-यांवर होणार कारवाई, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 06:38 IST