Join us
Daily Top 2Weekly Top 5

१४ फुटांपेक्षा उंच झोपड्यांवर होणार कारवाई

By admin | Updated: October 2, 2016 01:36 IST

काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खूश करण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरू असताना आयुक्तांनी मात्र त्यांची हक्काची ‘व्होट बँक’च

मुंबई : काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खूश करण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरू असताना आयुक्तांनी मात्र त्यांची हक्काची ‘व्होट बँक’च धोक्यात आणली आहे. १४ फुटांवरील उंच झोपड्यांवरील कारवाईला राजकीय पक्षांकडून विरोध होत असतानाही आयुक्त आपल्या निर्णयावर ठाम त्याबाबत कारवाई सुरू करण्याचे आदेश त्यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना दिले, त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे ही कारवाई रद्द होण्यासाठी पालिका प्रशासनावर राजकीय दबाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या काही वर्षांत अनेक झोपड्या चार ते पाच मजली झाल्या आहेत. ही मंडळी हक्काचे मतदार असल्याने त्यांना राजकीय पक्षांचे संरक्षण असते. त्यामुळे झोपड्यांवरील कारवाई अनेकवेळा बारगळते, परंतु आयुक्त अजय मेहता यांनी झोपड्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी नियुक्त पथकाने हे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. काँग्रेसने यापुढे झोपड्यांना १९ फुटांपर्यंत उंची वाढवण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली. आयुक्तांनी ही मागणी फेटाळली. (प्रतिनिधी)