Join us
Daily Top 2Weekly Top 5

चार पॅथॉलॉजिस्टवर होणार कारवाई

By admin | Updated: December 7, 2015 01:44 IST

बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब्सना अधिकृत पॅथॉलॉजिस्टचा असलेला वरदहस्त आता थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत शनिवारी झालेल्या सुनावणीत राज्यातील चार

मुंबई : बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब्सना अधिकृत पॅथॉलॉजिस्टचा असलेला वरदहस्त आता थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत शनिवारी झालेल्या सुनावणीत राज्यातील चार पॅथॉलॉजिस्ट सकृतदर्शनी दोषी आढळल्याने, त्यांच्यावर आरोपपत्र दाखल होणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिषदेतील सूत्रांनी दिली.अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबना अधिकृत पॅथॉलॉजिस्ट स्वत:चे लेटरहेड देऊन, तसेच सह्या करण्याची मुभा देत होते. अशी पॅ्रक्टिस करणाऱ्या चार पॅथॉलॉजिस्टच्या विरोधात महाराष्ट्र असोसिएशन आॅफ पॅ्रक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट या संघटनेने परिषदेकडे तक्रार नोंदविली होती. शनिवार, ५ डिसेंबर रोजी या चौघांची दुसरी सुनावणी झाली. यात त्यांच्यावर पुढील कारवाई होणार हे निश्चित झाले. या चौघांनी मिळून सुमारे १०० पॅथॉलॉजी लॅब्सना स्वत:चे लेटरहेड, नोंदणी क्रमांक आणि डिजिटल सह्या वापरण्यास दिल्या होत्या. या सर्व बोगस लॅब टेक्निशियन चालवत असल्याचे सुनावणीत स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)