Join us

...तर रक्तपेढ्यांवर होणार कारवाई

By admin | Updated: May 30, 2017 04:35 IST

रक्तपेढ्यांमधील उपलब्ध रक्त गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याने अनेकांना रक्तासाठी वणवण करावी लागते. यावर तोडगा म्हणून आता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रक्तपेढ्यांमधील उपलब्ध रक्त गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याने अनेकांना रक्तासाठी वणवण करावी लागते. यावर तोडगा म्हणून आता रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्याची स्थिती अद्ययावत करण्याची सूचना राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने दिली आहे. रक्तसाठ्याची स्थिती संकेतस्थळावर अद्ययावत न केल्यास कारवाई करण्यात येईल.राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने रक्तपेढ्यांना रोजचा रक्तसाठा नॅशनल हेल्थ पोर्टल आॅफ इंडियाच्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यास सांगितले आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या रक्तपेढ्यांविषयी नॅशनल ब्लड ट्रान्सफ्यूजन कौन्सिल संस्थेला माहिती देऊन त्यांच्यावर कारवाई होईल, असे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या अनिरुद्ध वाणी यांनी सांगितले.सुविधेअभावी रक्त वायारक्त साठवण्याच्या सुविधेअभावी मागच्या पाच वर्षांत देशभरातील विविध रक्तपेढ्यांना रक्ताचे २८ लाख युनिट्स फेकून द्यावे लागल्याचे माहिती अधिकारातून नुकतेच समोर आले होते.