Join us
Daily Top 2Weekly Top 5

तर शिल्पा शेट्टीवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:06 IST

* साडेपाच तासांच्या चौकशीनंतरही पुन्हा बोलविणार*अश्लील चित्रफीत प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बहुचर्चित अश्लील चित्रफीत ...

* साडेपाच तासांच्या चौकशीनंतरही पुन्हा बोलविणार

*अश्लील चित्रफीत प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बहुचर्चित अश्लील चित्रफीत रॅकेटप्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्रा याची पत्नी सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सुमारे साडेपाच तास तिची चौकशी केली. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून त्याची पडताळणी करण्यासाठी तिला पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे. त्या चौकशीत तथ्य आढळल्यास तिच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.

पॉर्न प्रकरणात दररोज नवनव्या बाबी उघडकीस येत आहेत. शुक्रवारी राज कुंद्राच्या घरी छापा टाकून काही दस्ताऐवज जप्त करण्यात आले. पोलिसांनी शिल्पाकडे कसून विचारणा केली तिच्या नावावर एकूण २३ कंपन्या असून ती व्यवसायात पती राज कुंद्राची भागीदारही आहे. यापूर्वी ती राजच्या ‘वियान इंडस्ट्रीज’ची सहमालक होती. पण गेल्या वर्षीच तिने राजीनामा दिला आहे. राजच्या हॉटशॉटअ‍ॅपबद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. मात्र अधिकारी त्याबाबत साशंक असून त्याबाबत पाडताळणी केली जात आहे. कारण शिल्पाच्या खात्यात अनेकदा या अ‍ॅप्सची रक्कम जमा झाल्याचे बँक व्यवहारांवरून स्पष्ट होत आहे. राजच्या अ‍ॅडल्ट कंटेंट कंपनी ‘केनरीन’मध्ये शिल्पा भागीदार आहे. त्यामुळे तिच्याकडे पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. गुन्ह्यातील तिच्या प्रत्यक्ष सहभागाबद्दल स्पष्टता झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.