Join us  

बेस्टची वाट अडविणाऱ्यांवर होणार कारवाई; फेरीवाले, खासगी गाड्यांचे बस स्टॉपवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 4:03 AM

बेस्ट उपक्रमाने मुंबईत अनेक ठिकाणी उभ्या केलेल्या बस थांब्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. खासगी गाड्या बस थांब्याबाहेरच उभ्या केल्या जात असल्याने, प्रवाशांची गैरसोय आणि बेस्टच्या बसगाड्या उभ्या करण्यातही अडचणी येत आहेत.

मुंबई : बेस्ट उपक्रमाने मुंबईत अनेक ठिकाणी उभ्या केलेल्या बस थांब्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. खासगी गाड्या बस थांब्याबाहेरच उभ्या केल्या जात असल्याने, प्रवाशांची गैरसोय आणि बेस्टच्या बसगाड्या उभ्या करण्यातही अडचणी येत आहेत. यामुळे बºयाच वेळा प्रवाशी निघून जात असल्याने, बस थांब्याजवळ गाडी उभी करणारे व फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे अधिकार बेस्ट परिवहन विभागाला द्यावेत, अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी वाहतूक पोलिसांना केली आहे.मुंबईत बेस्ट उपक्रमामार्फत सुमारे चार हजार बसगाड्या चालविण्यात येतात. यासाठी बस थांबे व काही ठिकाणी बस आश्रयस्थान निर्माण करण्यात आले आहे. मात्र, या बस आश्रयस्थानावर गर्दुल्ले, भिकारी, फेरीवाले यांचे अतिक्रमण आहे,तर बस थांब्याबाहेरील जागेचावापर खासगी गाड्या उभ्या करण्यासाठी होत आहे. त्यामुळेअनेक वेळा प्रवाशी वैतागून आॅटो-रिक्षा किंवा अन्य पर्याय निवडतात. याचा परिणाम बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नावर होत आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी स्टीलचे बस थांबे बसविण्यात आले आहेत. उन्हाळ्यात व पावसाळ्यात त्रास होऊ नये, यासाठी बस थांब्यावर शेडही टाकण्यात आल्या आहेत. बेस्टच्या बस थांब्यापासून १५ मीटरपर्यंत गाडी पार्क करण्यास सक्त मनाई आहे. तरीही नियम धाब्यावर बसवत खासगी गाड्या उभ्या केल्या जातात, तसेच फेरीवाल्यांनीही आपले बस्तान बस थांब्यावर बसविले आहे. वाहतूक विभागाने बेस्ट परिवहन विभागाला कारवाईचे अधिकार द्यावेत. या कारवाईतून मिळणारा दंड वाहतूक पोलीस विभागालाच देण्यात येईल, असे चेंबूरकर यांनी सांगितले.झोपड्यांनीही घेतला ‘थांब्यां’चा आधारजे. जे. उड्डाणपुलाखाली असणाºया बस थांब्यावर फेरीवाले व खासगी गाड्यांचे अतिक्रमण आहे.दादर, मुंबई सेंट्रल, अ‍ॅन्टॉप हिल, घाटकोपर, मालाड मालवणी, गोरेगाव या भागातील बस थांबे फेरीवाले व गाडी पार्क करणाºयांनाच आंदण दिल्याचे दिसून येते.मुंबईत एकूण ६ हजार ३२४ बस थांबे आहेत. यापैकी काही स्टीलचे बस थांबे व बसण्याची व्यवस्था आहे. अशा बस थांब्याचा आधार घेऊन काही ठिकाणी झोपड्या उभ्या राहिल्या आहेत.

टॅग्स :बेस्ट