Join us

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

By admin | Updated: September 25, 2016 03:46 IST

पश्चिम उपनगरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात आली असून, त्यात १४९ चारचाकी हातगाड्या, ६५ शेगड्या व ६३ सिलिंडर्स जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात

मुंबई : पश्चिम उपनगरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात आली असून, त्यात १४९ चारचाकी हातगाड्या, ६५ शेगड्या व ६३ सिलिंडर्स जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या अनधिकृत चारचाकी हातगाड्या दंड भरून सोडल्यास किंवा लिलावात विकल्यास त्या परत अनधिकृत व्यवसायांसाठी वापरल्या जाण्याचा अनुभव लक्षात घेता जप्त करण्यात आलेल्या या हातगाड्या नष्ट करण्यात येणार आहेत तर जप्त केलेल्या शेगड्यांचा लिलाव केला जाईल.आर उत्तर, आर मध्य, आर दक्षिण, पी दक्षिण, पी उत्तर, के पश्चिम या सहा विभागांमध्ये ही कारवाई करण्यात आली. आर उत्तर विभागातील कारवाईदरम्यान प्रामुख्याने दहिसर परिसरातून २४ हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर आर मध्य परिसरात केलेल्या कारवाईदरम्यान बोरीवली परिसरातून २० हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने कांदिवली परिसरासह चारकोपचा समावेश असलेल्या आर दक्षिण विभागातून ३ हातगाड्यांसह ५७ शेगड्या आणि ५८ सिलिंडर्स जप्त करण्यात आले आहेत. पी दक्षिण विभागात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान प्रामुख्याने गोरेगाव परिसरातून ३२ हातगाड्यांसह ५ सिलिंडर्स व ८ शेगड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर पी उत्तर विभागात करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान प्रामुख्याने मालाड, मालवणी इत्यादी परिसरातून ३० हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच प्रामुख्याने अंधेरी पश्चिम, वर्सोवा, ओशिवरा, विलेपार्ले व जोगेश्वरी इत्यादी परिसरांचा समावेश असलेल्या के पश्चिम विभागातून ४० हातगाड्या जप्त करण्यात आल्या. सहा विभागांतून एकूण १४९ चारचाकी हातगाड्या, ६३ गॅस सिलिंडर्स व ६५ शेगड्या जप्त केल्या. जप्त साहित्य पी दक्षिण विभागाच्या गोदामात ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)आर उत्तर, आर मध्य, आर दक्षिण, पी दक्षिण, पी उत्तर, के पश्चिम या सहा विभागांमध्ये ही कारवाई करण्यात आली. आर उत्तर विभागातील कारवाईदरम्यान प्रामुख्याने दहिसर परिसरातून २४ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. आर मध्य परिसरात बोरीवली परिसरातून २० हातगाड्या जप्त करण्यात आल्या. तर याशिवाय आर दक्षिण विभागातून ३ हातगाड्यांसह ५७ शेगड्या आणि ५८ सिलिंडर्स जप्त करण्यात आले. या वेळी शेगड्या, सिलिंडर्सही जप्त केले.