ठाणो : ठाणो महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कळवा, नौपाडा आणि वर्तकनगर प्रभाग समित्यांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे.
या कारवाईत कळव्यातील दत्त मंदिर, भवानी चौक विटावा येथील तळ अधिक तीन मजली इमारत, सुमनाई शाळेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बांधकामावर, सूर्यनगर, कळवा हिंदू हायस्कूलजवळील वाघोबानगर, जानकीनगर, महात्मा फुलेनगर, कोळीवाडा, घोलाईनगर आदी भागांतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. तसेच खारेगाव नाका ते पारसिकनगर, कळवा चौक ते खारेगाव नाका, विटावा नाका, टीएमटी बस डेपो, स्टेशन रोड आदी भागांतील अनधिकृत फेरीवाले, हातगाडय़ा आदींवरदेखील कारवाई झाली. तसेच नौपाडा प्रभाग समितीमधील महागिरी येथील अनधिकृत इमारतीतील पाचव्या मजल्याचे व सहाव्या मजल्यावरील वाढीव बांधकाम तोडण्यात आले. वर्तकनगर परिसरातील डॉ. काशिनाथ घाणोकर नाटय़गृहासमोरील तात्पुरत्या शेड्स, विवेकानंदनगर येथील बांधकाम तोडण्यात आले.