Join us

दोन विक्रीकर अधिकार्‍यांवर कारवाई

By admin | Updated: May 20, 2014 02:22 IST

व्हॅट नंबरच्या रजिस्ट्रेशनसाठी लाच मागणार्‍या दोघा विक्रीकर अधिकार्‍यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

नवी मुंबई : व्हॅट नंबरच्या रजिस्ट्रेशनसाठी लाच मागणार्‍या दोघा विक्रीकर अधिकार्‍यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. सोमवारी दुपारी कोकण भवन येथे ५०० व ३०० रुपयांची लाच घेताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. व्हॅट कन्सल्टंटच्या तक्रारीनुसार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली. कोकण भवन येथील रायगड विक्रीकर विभागामध्ये व्हॅट कन्सल्टंट असलेल्या व्यक्तीला व्हॅट नंबरचे रजिस्ट्रेशन करायचे होते. परंतु या कामासाठी विक्रीकर अधिकारी प्रवीण शेट्टी यांनी ३०० रुपये तर विक्रीकर निरीक्षक राजश्री देशपांडे यांनी ५०० रु पयांची मागणी केली होती. याची तक्र ार सदर व्यक्तीने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी अडीच वाजता कोकण भवन येथील विक्र ीकर कार्यालयात सापळा लावण्यात आला होता. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांवर कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)