Join us

विनामास्क रेल्वे प्रवास करणाऱ्या १,२५१ प्रवाशांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:06 IST

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सोशल डिस्टसिंग याचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु अनेक प्रवासी लोकलमधून विनामास्क प्रवास ...

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सोशल डिस्टसिंग याचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु अनेक प्रवासी लोकलमधून विनामास्क प्रवास करतात. अशा प्रवाशांवर पालिका आणि रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने १ फेब्रुवारी ते १९ जुलैदरम्यान १,२५१ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क लोकल प्रवासासाठी मुभा नाही. लोकल प्रवाशांना नियम पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. मात्र, काही प्रवासी विनामास्क प्रवास करत आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढत आहे. विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे आणि महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पश्चिम मार्गावर सहा महिन्यात १ लाख ६३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना रेल्वे प्रवासाची मुभा नाही. मात्र, तरीही अनेक जण अवैध रितीने प्रवास करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.