Join us

सहा डम्परवर कारवाई

By admin | Updated: August 29, 2014 00:48 IST

परवानगी दिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त दुसरीकडे डेब्रिज टाकणाऱ्या ६ डम्परवर भरारी पथकाने कारवाई केली आहे. सर्व वाहने जप्त करून कोपरखैरणे क्षेपणभूमीवर ठेवण्यात आली आहेत

नवी मुंबई : परवानगी दिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त दुसरीकडे डेब्रिज टाकणाऱ्या ६ डम्परवर भरारी पथकाने कारवाई केली आहे. सर्व वाहने जप्त करून कोपरखैरणे क्षेपणभूमीवर ठेवण्यात आली आहेत. मुंबई व ठाणेमधून मोठ्याप्रमाणात डेब्रिज नवी मुंबईमधील मोकळ्या भूखंडावर टाकले जात आहे. डेब्रिज माफियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने भरारी पथक तयार केले आहे. परंतु यानंतरही शेकडो डम्पर शहरात येत आहेत. डेब्रिजची वाहतूक करणाऱ्या काहींनी परवानगी घेतलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त दुसऱ्याच ठिकाणी डेब्रिज टाकण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी औद्योगिक वसाहतीमध्ये डेब्रिज टाकणारी सहा वाहने महापालिकेच्या भरारी पथकाने ताब्यात घेतली. संबंधितांनी चुकीच्या ठिकाणी डेब्रिज टाकल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधितांवर नियमाप्रमाणे कारवाई करून सर्व वाहने कोपरखैरणे क्षेपणभूमीवर ठेवल्याची माहिती उपआयुक्त सुभाष गायकर व सहायक आयुक्त प्रकाश वाघमारे यांनी दिली . (प्रतिनिधी)