Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यावरील बांधकामांवर पावसाळ्यानंतर कारवाई

By admin | Updated: June 20, 2015 23:03 IST

पावसाळा सुरु होताच, शहरातील दोन ठिकाणी नाल्यावरील घरे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच नाल्याची भिंतही पडल्याची घटना घडली होती.

ठाणे : पावसाळा सुरु होताच, शहरातील दोन ठिकाणी नाल्यावरील घरे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच नाल्याची भिंतही पडल्याची घटना घडली होती. त्यामुळे आता नाल्यावरील बांधकामाबाबत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गंभीर दखल घेतली असून पावसाळा संपल्यानंतर या बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचेही त्यानी बुधवारी झालेल्या महासेभत स्पष्ट केले.पावसाळा सुरु होताच वागळे पट्ट्यातील एक घर अतिक्र मणिवरोधी पथकाने पाडल्याचा आरोप भाजपा सदस्याने महासभेत केला. पावसाळा सुरु झाल्याने या घरावर कारवाई केल्याने येथे राहणाऱ्या नागरिकांच्या निवाराच्या प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांने सांगितले. यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी सांगितले की, ते घर नसून एक पिठाची चक्की होती. तसेच ती पूर्णपणे नाल्यावर वसलेली होती. त्यामुळे साफसफाईस अडचणी निर्माण होत होत्या. तेथून कर्मचाऱ्यांना खाली उतरणे सामुग्री घेवून जाणे कठीण झाले होते. त्याबाबत संबधीत मालकाला महापालिकेने नोटीस बजावली होती. त्यांनतरच ही कारवाई केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंत,ु ही कारवाई येथेच न थांबता यापुढे ज्या ज्या ठिकाणी अशाप्रकारे नाल्यावर वास्तू उभ्या आहेत, त्या सर्वांवर पावसाळा संपल्यानंतर तोडू कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत त्या सर्व लोकांना नोटीसा बजावण्यात येणार असून या कारवाईदरम्यान कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)