Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण शुल्क नियमांचे पालन न केल्यास कारवाई

By admin | Updated: May 30, 2015 22:33 IST

शिक्षण शुल्क कायद्यांतर्गत ज्या शाळा त्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्या शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

डोंबिवली : शिक्षण शुल्क कायद्यांतर्गत ज्या शाळा त्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्या शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सातत्याने येणाऱ्या तक्रारींमध्ये विशेषत: आयसीएसई आणि सीबीएसई शाळांचा समावेश सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्यावर निश्चित बंधने येतील, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी डोंबिवलीत व्यक्त केला.शुक्रवारी दिवसभर ते कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यादरम्यान त्यांनी कल्याणच्या वाणी विद्यालयाच्या नव्या वास्तूचे अनावरण केले, तर डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आणि डोंबिवलीकर दूध या प्रकल्पाचा शुभारंभ केला.मुंबई-ठाण्यासह एमएमआरडीए क्षेत्राचा शैक्षणिक आराखडा तयार करण्यात येत असून येथे महाविद्यालय, शाळांचे महत्त्व आहे. याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यापूर्वी शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण करण्यात आले होते. त्याला चाप लावण्याचे काम सुरू असून यापुढे बालभारतीचे प्रभुत्व वाढविण्याचा प्रयत्न असेल. या क्षेत्रात नवीन येणाऱ्या शिक्षकांचा राज्य शासनाकडून विशेष सत्कार करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. मनपात समावेश झालेल्या २७ गावांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना महापालिकेत सामावून घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार, आबा पटवारी, सुधीर जोगळेकर, शशिकांत कांबळे, शिवाजी आव्हाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘डोंबिवलीकर दूध’चा शुभारंभ यानिमित्ताने त्यांनी येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात भाजपाच्या मेळाव्यापूर्वी ‘डोंबिवलीकर दूध’ या सहकार तत्त्वावर आधारित प्रकल्पाचा शुभारंभ केला. त्या वेळी या दूध व्यवसायातून मिळणारा नफा हा या ठिकाणच्या वृद्धाश्रमासाठी वापरण्यात येणार आहे. खेळिया पुस्तकाचे अनावरण याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘दी गेम चेंजर’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करण्यात आलेल्या मैत्रेय प्रकाशनच्या ‘खेळिया’ या पुस्तकाचे अनावरणही नाट्यगृहात करण्यात आले.