Join us

हेल्थ केअरवर कारवाई

By admin | Updated: June 24, 2015 04:55 IST

खारघर येथील हेल्थ केअर सेंटरमध्ये चालणारा देहविक्रीचा व्यवसाय गुन्हे शाखा पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. या छाप्यामध्ये पाच महिलांची सुटका करून

नवी मुंबई : खारघर येथील हेल्थ केअर सेंटरमध्ये चालणारा देहविक्रीचा व्यवसाय गुन्हे शाखा पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. या छाप्यामध्ये पाच महिलांची सुटका करून सेंटर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सेक्टर-८ येथील प्राइड हेल्थ केअर सेंटरमध्ये देहविक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पुष्पलता दिघे यांच्या पथकाने छापा टाकला. पाच महिलांची सुटका करून मॅनेजर सलमान शेख याला अटक करण्यात आली. अजय वर्मा हा त्या सेंटरचा मालक असून त्याच्या माध्यमातून देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. मसाजसाठी येणाऱ्या ग्राहकाच्या मागणीनुसार तिथेच काम करणाऱ्या महिलांना ते देहविक्रीसाठी भाग पाडत असत. याची माहिती मिळताच बनावट ग्राहकाद्वारे पोलिसांनी खात्री पटवून तिथे छापा टाकला. (प्रतिनिधी)