Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सिगारेट विक्रेत्यांवर कारवाई

By admin | Updated: October 30, 2016 00:45 IST

आयात सिगारेटवर नियमाप्रमाणे माहिती न छापल्याप्रकरणी वैधमापन शास्त्र विभागाने राज्यातील ३३ पान दुकानांवर कारवाई करून खटले दाखल केले आहेत, अशी माहिती

मुंबई : आयात सिगारेटवर नियमाप्रमाणे माहिती न छापल्याप्रकरणी वैधमापन शास्त्र विभागाने राज्यातील ३३ पान दुकानांवर कारवाई करून खटले दाखल केले आहेत, अशी माहिती वैधमापन शास्त्र नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी सांगितली. मुंबईतील विजय पान शॉप, कलंदर पान शॉप (विलेपार्ले), सिझ स्प्रे कार्टर (वांद्रे), कपिल देव शुक्ला (काला घोडा), अब्दुल अब्दुनी (लायन गेट), जमीर अब्दुला (चर्चगेट), एस.एस. ट्रेडर्स (फोर्ट) आदी दुकानांवर कारवाई झाली. आयात सिगारेट पाकिटावर योग्य माहितीची खात्री ग्राहकांनी करून घ्यावी, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे. (प्रतिनिधी)