Join us
Daily Top 2Weekly Top 5

सफाळे पोलिसांची धडक कारवाई

By admin | Updated: September 23, 2014 00:40 IST

धडक कारवाईचा बडगा उगारून मौजे विराथन खुर्द येथील लक्ष्मण पाटील या इसमाच्या घराजवळील जुगार अड्यावर शनिवारी सायंकाळी छापा टाकला

सफाळे : विधानसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी पालघर जिल्ह्णाचे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी दिलेल्या आदेशानुसार सफाळे पोलीसांनी अवैध धंद्यावर धडक कारवाईचा बडगा उगारून मौजे विराथन खुर्द येथील लक्ष्मण पाटील या इसमाच्या घराजवळील जुगार अड्यावर शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यात सुमारे १ लाख ५६ हजारांचा मुद्देमालासह इतर आठ जणांना अटक करून जामिनावर सोडून दिले.हर्षल भोईर रा. मांडे, पुंडलिक घरत, अजित किणी व किशोर घरत रा. विराथन खु. तसेच संजय भोईर, सचिन किणी, स्वप्नील म्हात्रे व किशोर किणी सर्व राहणार विठ्ठलवाडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील मुख्य आरोपी लक्ष्मण हा त्याच्या घराशेजारील मोकळ्या खुलेआम जुगार अड्डा चालवित असल्याची खबर सफाळे पोलीसांना मिळाली. त्यानुसार सफाळे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मानसिंग पाटील यांनी पो. उपनिरिक्षक वारे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे पथम बनवून या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. याशिवाय परिसरातील अवैध दारू अड्यावरही कारवाई केल्याचे सर्वांचे धाबे दणाणले आहे.(वार्ताहर)