उरण : मुंबईत विषारी दारूमुळे १०२ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर उरणमधील पोलीस अवैध दारूधंद्यांवर कारवाईस सज्ज झाले आहे. न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात धंदेवाल्यांवर कारवाई केली आहे. न्हावा-शेवा पोलीस ठाणे, मोरा पोलीस ठाणे सतर्क झाले आहे. उरणचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा इसमांवर कारवाई करण्यात आली. न्हावा-शेवातील एका इसमावरही अशी कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधिकारी राजेश देवरे यांनी सांगितले. मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी दारू विक्रीचे धंदेच नसल्याचे वरिष्ठ अधिकारी ए. एस. पठाण यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
दारूप्रकरणी कारवाई
By admin | Updated: June 25, 2015 02:59 IST