Join us

लाचखोर अधिका-यावर ‘एसीबी’ची कारवाई

By admin | Updated: January 17, 2015 01:29 IST

मीटर बसवण्यासाठी लाच मागणा-या विद्युत विभागाच्या सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना अँटी करप्शनने (एसीबी) अटक केली.

नवी मुंबई : मीटर बसवण्यासाठी लाच मागणा-या विद्युत विभागाच्या सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना अँटी करप्शनने (एसीबी) अटक केली. थ्री फेजचे मीटर बसवण्यासाठी या अभियंत्याने ग्राहकाकडे ४० हजारांची लाच मागितली होती.वीज वितरण कंपनीच्या पनवेल येथील गवाण कार्यालयात शुक्रवारी दुपारी ही कारवाई झाली. गवाण येथील एका नागरिकाला व्यावसायिक गाळ्यामधे थ्री फेज विद्युत मीटर बसवायचा होता. त्याकरिता विद्युत विभाग कार्यालयातील कंत्राटी कामगार गजानन कोळी याने ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच सहाय्यक अभियंता हेमंत जाधव यांना हवी असल्याचेही कोळी याने अर्जदाराला सांगितले. अर्जदाराने याबाबत जाधव याच्याकडे विचारणा केली असता त्याने ही लाचेची रक्कम कोळी याच्याकडे द्यायला सांगितले. याप्रकरणी विद्युत मीटरसाठी अर्ज केलेल्या ग्राहकाने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी दुपारी गवाण येथे वीज वितरणच्या कार्यालयात सापळा रचला. यावेळी लाच स्वीकारताना जाधव व कोळी या दोघांवर कारवाई केल्याचे नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विवेक जोशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)