Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोकण परिक्षेत्रात ३०० दारूअड्ड्यांवर कारवाई

By admin | Updated: July 7, 2015 01:58 IST

मालवणी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोकण परिक्षेत्रात अवैध दारूविक्रीच्या ३०० ठिकाणांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ११३ कारवाया ठाणे ग्रामीण क्षेत्रात करण्यात आल्या आहेत

सूर्यकांत वाघमारे  नवी मुंबईमालवणी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोकण परिक्षेत्रात अवैध दारूविक्रीच्या ३०० ठिकाणांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ११३ कारवाया ठाणे ग्रामीण क्षेत्रात करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण मोहिमेअंतर्गत २०८ जणांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे १० लाखांचा दारूसाठा व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.मालवणी येथील दारूच्या अड्ड्यावरील विषारी दारू प्यायल्याने शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला. या घटनेला दोषी धरत संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाच्या कारवाया झाल्या. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी अवैध दारूविक्रीच्या अड्ड्यांवर कारवाया करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. धाडींमध्ये ३०० दारुअड्ड्यांवर कारवाई केल्याचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी सांगितले. ९ लाख ७१ हजार रुपये किमतीची दारू व दारू बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. (प्रतिनिधी) कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षकांनी दारूच्या अड्ड्यांवर केलेल्या कारवाईच्या आकड्यांवरून बहुतेक अड्डे शहराजवळील निर्जन ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. च्विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून हे अड्डे बिनदिक्कत सुरू होते. मालवणी दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस यंत्रणेने तातडीने या अड्ड्यांवर कारवाई करून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला आहे.