Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैमानिकावर बलात्काराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:06 IST

ओशिवऱ्यात मॉडेलची पाेलिसांत तक्रारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप एका मॉडेलने वैमानिकावर केला. ...

ओशिवऱ्यात मॉडेलची पाेलिसांत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप एका मॉडेलने वैमानिकावर केला. याप्रकरणी मंगळवारी ओशिवरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.

पीडितेची ए. सेठी नावाच्या वैमानिकासोबत गेल्या वर्षी एका वधू-वर सूचक संकेतस्थळामार्फत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात फोनवरून गप्पा सुरू झाल्या. घरी एकटी राहत असल्याने तो घरी गेला आणि बलात्कार केला, असा पीडितेचा आराेप आहे. आई-वडील भोपाळला राहत असून, लवकरच त्यांची भेट घडवून देताे, असे वैमानिकाने सांगितले हाेते. मात्र, त्यानंतर ताे तिला टाळू लागला. याप्रकरणी अखेर तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. चाैकशी सुरू असून, अद्याप त्याला अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

....................