Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी गैरवर्तणूक केल्याचा अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीचा आरोप

By admin | Updated: January 5, 2016 08:46 IST

पोलिसांच्या वेशात आलेल्या चार ते पाच व्यक्तींनी आपल्या घरात घुसून गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला असा आरोप प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने केला आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ५ - पोलिसांच्या वेशात आलेल्या चार ते पाच व्यक्तींनी आपल्या घरात घुसून गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला असा आरोप प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने केला आहे. याप्रकरणी तिने कांदिवली पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 

कांदिवलीतील लालजीपाडा येथील आपल्या घरी पोलिसांच्या वेषातील चार ते पाच व्यक्ती आल्या व  त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केले, असे प्रत्युषाने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी मात्र प्रत्युषाचे आरोप फेटाळून लावले असून प्रत्युषासोबत राहणाऱ्या राहुल सिंग नावाच्या एका व्यक्तीला शोधण्यासाठी साध्या वेशातील पोलिस तिच्या घरी गेले होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तसेच प्रत्युषाशी कोणतेही गैरवर्तन केले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

'बालिका वधू' या मालिकेतील आनंदीच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या प्रत्युषाने झलक दिखला जा, पॉवर कपल अशा अनेक टीव्ही शोजमध्येही काम केले आहे.