Join us

आरोपीचे पोलीस ठाण्यातून पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2015 02:21 IST

लग्नाच्या आमिषाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन करण्याची घटना शनिवारी समतानगर

मुंबई : लग्नाच्या आमिषाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन करण्याची घटना शनिवारी समतानगर पोलीस ठाण्यात घडली. सिराज रमजानअली शेख (वय २५) असे त्याचे नाव असून, शुक्रवारी रात्री त्याला पकडले होते. सिराज शेख काही महिन्यांपासून समतानगरमध्ये राहत होता. त्याच दरम्यान त्याची ओळख परिसरातील एका १७ वर्षांच्या मुलीसोबत झाली. त्याने लग्नाचे आमिष दाखवून १० दिवसांपूर्वी पळवून नेले. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी समतानगर पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री या मुलीची सुटका करत शेखला ताब्यात घेतले. शुक्रवारी त्याला चार्ज रूममध्ये बसवून ठेवण्यात आले होते. शनिवारी सकाळी त्याला अटक दाखविण्यासाठी पोलीस तेथे गेले तेव्हा तो आढळला नाही. त्याला सर्वत्र शोधण्यात आले. मात्र तो कुठेच न सापडल्याने त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस उपायुक्त रामकुमार यांना विचारले असता त्यांनी आरोपीचा शोध सुरू असून, या प्रकरणी निष्काळजीपणा दाखविणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.