मुंबई : बोरीवलीच्या धर्मानगर परिसरातील विचारे कम्पाउंडमध्ये १५ ते २० दिवसांपूर्वी झाडांची तोड करण्यात आली होती, ज्यात तिवरांच्या झाडांची संख्या अधिक असल्याचा स्थानिकांचा आरोप होता. या प्रकरणी पालिकेच्या आर मध्य विभागाकडून एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. एमएचबी पोलिसांनी ३ मार्च रोजी या प्रकरणाची एनसी दाखल केली होती. मात्र याच प्रकरणात आज इकोहोम कन्स्ट्रक्शनच्या संचालकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पालिकेच्या आर मध्य विभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १५ ते २० दिवसांपूर्वी धर्मानगर परिसरात काही झाडे तोडल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार अमोल इंगळे या पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याने ३ मार्च रोजी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी एनसी दाखल केली. चौकशीअंती एमएचबी पोलिसांनी आज एफआयआर दाखल केला. परिमंडळ ११चे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी या प्रकरणी दुजोरा दिला. पोलिसांनी १९६ झाडांच्या कत्तल प्रकरणी ईपीए १९७५ आणि ट्री प्रोटेक्शन अॅक्ट, १९७५ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.वन विभागाचा दावाविचारे कम्पाउंडमध्ये झाडांची तोड झाल्याप्रकरणी आम्ही वन विभागाला चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांच्या अहवालाचे एक पत्र त्यांनी आम्हाला गुरुवारी दिले आहे, ज्यात विचारे कम्पाउंडमध्ये तोडण्यात आलेल्या झाडांमध्ये तिवरांची झाडे नसल्याची माहिती पालिकेच्या आर मध्य विभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)च्तीन वर्षांपूर्वी देखील अशा प्रकारे या ठिकाणी तिवरांची तोड करण्यात आली होती. ही बाब मला समजल्यानंतर मी या ठिकाणी भेट दिली. तेव्हा सीआरझेडच्या कक्षेत मोडणाऱ्या या परिसरात एकही झाड नसल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यामुळे जवळच असलेल्या गवतांचे भारे मी जेसीबीच्या मदतीने उपसले. तेव्हा तिवरांची झाडे तोडून जाळण्यात आल्याचे मी पाहिले. या ठिकाणी अनधिकृतपणे झाडांची कत्तल करून बंगला बांधण्याचा या कंपनीचा मनसुबा होता. च्त्यानंतर या प्रकरणी मी पालिका, तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि एमएचबी पोलीस ठाण्याशी पत्रव्यवहार केला. या प्रकरणी कंपनीला २ कोटींचा दंड ठोठावला होता. मात्र ५० लाख रु पये भरून हे प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप नगरसेवक शिवा शेट्टी यांनी केला आहे.
इकोहोम कन्स्ट्रक्शनच्या संचालकावर आरोप
By admin | Updated: March 21, 2015 02:03 IST