Join us
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातून आरोपीला अटक

By admin | Updated: September 17, 2014 02:48 IST

मजुरीचे 100 रुपये मागण्यासाठी गेलेल्या तरुणावर हातोडय़ाने हल्ला करीत त्याची हत्या केल्याची घटना 23 ऑगस्टला मानखुर्द परिसरात घडली होती.

मुंबई: मजुरीचे 1क्क् रुपये मागण्यासाठी गेलेल्या तरुणावर हातोडय़ाने हल्ला करीत त्याची हत्या केल्याची घटना 23 ऑगस्टला मानखुर्द परिसरात घडली होती. याबाबत मानखुर्द पोलिसांनी उत्तर प्रदेशातून एका आरोपीला अटक केली आहे; तर त्याच्या दुस:या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. 
 संदीपकुमार निर्मल (35) असे या मृत तरुणाचे नाव असून, तो मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाउंड परिसरात राहत होता. मूळचा पश्चिम बंगाल येथे राहणारा हा तरुण याच परिसरात मजुरीचे काम करीत होता. वर्षभरापूर्वी या इसमाची ओळख याच परिसरात कंत्रटदार असलेल्या अमलकुमार मंडल (33) याच्यासोबत झाली होती. त्यामुळे जिथेही काम असेल तिथे दोघे जण एकत्र काम करीत होते. काही दिवसांतच त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाल्याने काम संपल्यानंतर दारू पिण्यासाठी दोघेही एकत्र बसत होते. घटनेच्या दोन दिवस अगोदर अमलकुमारने निर्मल याला काम केलेले पैसे घरी घेण्यासाठी बोलावले. त्यानुसार निर्मलने त्याच्या घरी येऊन पैसे घेतले. मात्र त्यात 1क्क् रुपये कमी असल्याने त्याने याबाबत त्याच्याकडे विचारणा केली. यावर आरोपीने बाकीचे पैसे नंतर देतो, असे सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा दारू पिण्यासाठी एकत्र बसले. यावेळी निर्मल आरोपीकडे 1क्क् रुपयांची मागणी केली. त्यावर आरोपीने त्याला 1क्क् रुपये देण्यास नकार दिला. याच कारणावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने त्याच्या एका सहका:याच्या मदतीने 
निर्मल याच्या डोक्यावर हातोडय़ाने वार केले. त्यानंतर तिथून त्याने पळ काढला. 
दरम्यान, घटनेच्या दिवशी मृत तरुणासोबत मंडल आणि त्याचा एक साथीदार असल्याचे पोलिसांना समजले. मात्र हत्येनंतर आरोपीने उत्तर प्रदेशात पळ काढला होता. त्यानुसार पोलिसांनी मंडलच्या मोबाइल लोकेशनवरून त्याला दुमरियागंज येथून अटक केली; तर त्याच्या दुस:या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
 
दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने त्याच्या एका सहका:याच्या मदतीने निर्मल याच्या डोक्यावर हातोडय़ाने वार केले. त्यानंतर तिथून त्याने पळ काढला. दुस:या दिवशी ही घटना उघड झाल्यानंतर मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला.