Join us

भांडुपमध्ये तडीपार आरोपीस गावठी क˜्यासह अटक

By admin | Updated: September 29, 2014 21:47 IST

भांडुपमध्ये तडीपार आरोपीस गावठी क˜्यासह अटक

भांडुपमध्ये तडीपार आरोपीस गावठी क˜्यासह अटक
मुंबई: हत्येचा प्रयत्न, मारहाण अशा गुन्ह्यांमध्ये तडीपार असलेल्या आरोपीस गावठी कट्टा आणि १ जिवंत काडतुसासहित भांडुप पोलिसांनी अटक केली आहे. गोविंद अर्जुन बागुल (२६) असे आरोपीचे आहे.
बागुल हा भांडुप तुळशेत पाडा परिसरात राहण्यास आहे. गेल्या अनेक महिन्यापासून भांडुप पोलीस त्याचा शोध घेत होते. बागुल टेंभीपाडा येथे येणार असल्याची माहिती भांडुप पोलिसांना मिळाली. त्यानुसार भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप चव्हाण यांंच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शिवाजी लाड, पोलीस हवालदार भाऊ जगताप, संजय गायकवाड, पोलीस नाईक सुरेश मुळीक आणि विवेक आडकर यांनी सापळा रचून टेंभीपाडा पाईपलाईन येथून बागुलला अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी गावठी कट्टा आणि १ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे. याप्रकरणी विनापरवाना हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती भांडुप पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)