Join us

ढिल्या तपासामुळे गंडा घालणारे आरोपी मोकाट

By admin | Updated: December 17, 2014 01:48 IST

मुंबईतील पॉवरलूम व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा आरोपी आर्थिक गुन्हे शाखेच्या ढिल्या तपासामुळे मोकाट असल्याचा धक्कादायक आरोप

मुंबई : मुंबईतील पॉवरलूम व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा आरोपी आर्थिक गुन्हे शाखेच्या ढिल्या तपासामुळे मोकाट असल्याचा धक्कादायक आरोप निजाम झाबरमल रंगरेज या पॉवरलूम व्यापाऱ्याने केला आहे. निजाम यांना ४ कोटी ३३ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या या आरोपीला दोन वेळा कोठडीत रवाना केल्यानंतरही हडप केलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम त्याने नेमकी कुठे गुंतवली, याचा तपास करण्यात अपयश आल्याचा आरोप निजाम यांनी केला आहे.मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत निजाम म्हणाले, ‘नोव्हेंबर २०१२ साली महेंद्र रॉय यांच्याविरोधात ठाणे येथील शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रथम १२ दिवसांची पोलीस कोठडी आणि ७ महिन्यांची न्यायालयीन कोठडीची शिक्षाही रॉय याला सुनावण्यात आली. मात्र दरम्यानच्या काळात पोलिसांना रॉयने गंडा घालून कमावलेली रक्कम कुठे लपवली, त्याचा तपास लावता आला नाही. उच्च न्यायालयाने काही अटींवर दिलेल्या जामिनावर सुटलेला रॉय सर्रासपणे अटींचा भंग करत आहे. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात वॉरंट काढले आहे. मात्र त्यालाही रॉय जुमानत नाही.’