Join us

ड्रोन उडवणारा आरोपी गजाआड

By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST

ड्रोन उडवणारा आरोपी गजाआड

ड्रोन उडवणारा आरोपी गजाआड

मुंबई: पोलिसांची परवानगी न घेताच बीएआरसी परिससरात ड्रोन उडवणार्‍या एका आरोपीवर ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला बुधवारी अटक केली. सोमवारी दुपारी हा प्रकार देवनार बेस्ट डेपो समोर घडला होता.
मुंबईतील अतिसंवेदनशील परिसर असलेल्या भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) या ठिकाणी इमारतींचे फोटो काढण्यासाठी एका रियल इस्टेट कंपनीने ड्रोन उडवले होते. हा प्रकार एका प्राध्यापकाने पोलिसांना सांगताच पोलिसांनी तपास करत यामध्ये दोन जणांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर या ड्रोनच्या माध्यामातून काढलेले फोटो आक्षेपार्ह नसल्याचे समोर आले आहे. मात्र मुंबई शहरात ड्रोन उडवण्यास बंदी असताना या कंपनीने या नियमाचे उल्लंघन केल्याने ट्रॉम्बे पोलिसांनी शिवकुमार शहावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)