Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाजुद्दीन सिद्दकी विरोधात मारहाण केल्याचा महिलेचा आरोप

By admin | Updated: January 17, 2016 21:24 IST

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकी विरोधात एका महिलेने शारीरिक उत्पीड़न केल्याचा आरोप केला असून त्यांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १७ - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकी विरोधात एका महिलेने शारीरिक उत्पीड़न केल्याचा आरोप केला असून त्यांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या महीलेचे नाव अद्याप समोर आले नाही. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात नवाजुद्दीन सिद्दिकीविरोधात मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवाजुद्दीन राहत असलेल्या इमारतीखालील गाड्यांच्या पार्किंगच्या जागेवरुन हा वाद झाल्याचं समजतं आहे. महिलेने आरोप केला आहे की, पार्किंगवरुन वाद सुरु असताना नवाजुद्दीनने गैरवर्तन केलं आणि हात उगारला होता . महिलेच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिस अधिक तपास करत आहेत. लवकरच पोलीस पार्कींग मधील CCTV फुटेज पाहतील व त्यानंतर पुढील कारवाई करतील.सध्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी त्याच्या आगामी तीन सिनेमाच्या चित्रिकरणासाठी कोलकात्यात आहे. यामध्ये अमीताभ बच्चन यांची प्रमुख भुमीका आहे.