Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या नातेवाइकांसाठी मुक्कामाची व्यवस्था; आबाळ संपणार, ५७ सरकारी रुग्णालयांत होणार सोय

By संतोष आंधळे | Updated: February 21, 2024 09:20 IST

राज्यातील ५७ रुग्णालयांत ही व्यवस्था केली जाणार असून, २५२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार आहे.

संतोष आंधळे

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालय परिसरातच रुग्णांच्या नातेवाइकांसाठी निवास, प्रसाधनगृह आणि स्नानगृहांची व्यवस्था उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील ५७ रुग्णालयांत ही व्यवस्था केली जाणार असून, २५२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार आहे.

खासगी रुग्णालयांत एखादी व्यक्ती उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्याच्यासोबत एका नातेवाइकाची निवासाची व्यवस्था केली जाते. त्याला किमान एक बेडची व्यवस्था रुग्णाच्या शेजारी करण्यात येते.  त्या ठिकाणी आंघोळीची व्यवस्था केलेली असते. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णालयांत मात्र या सुविधांची वानवा असते. कारण रुग्णांची संख्या मोठी असते. त्यामुळे सर्व व्यवस्थेवर रुग्णाच्या उपचाराचा अतिरिक्त ताण असतो. या सर्व पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने पहिल्या टप्प्यात  ही योजना राबविण्यासाठी १०० कोटी निधी प्रस्तावित केला आहे. 

आरोग्य संस्थांचा प्रकार

२०० बेड्स व त्यावरील रुग्णालये

व्यवस्था

राहण्याची व्यवस्था : ५० बेड्स

शौचालये : २० (१० पुरुष

आणि १० स्त्रिया) 

स्नानगृह : ६ (४ पुरुष

आणि २ स्त्रिया)

आधुनिक शौचालय : ८ (४ पुरुष आणि ४ स्त्रिया)

मुतारी : १० दिव्यांग : १

प्रति रुग्णालय खर्च : ६ कोटी 

आरोग्य संस्थांची संख्या : १२

एकूण अंदाज खर्च : ७२ कोटी

१०० बेड्स व त्यावरील रुग्णालये

व्यवस्था

राहण्याची व्यवस्था : ३० बेड्स

शौचालय : १८ (९ पुरुष आणि ९ स्त्रिया) 

स्नानगृह : ६ (४ पुरुष आणि २ स्त्रिया)

आधुनिक शौचालय : ४ (२ पुरुष आणि २ स्त्रिया)

मुतारी : ५. दिव्यांग : १

प्रति रुग्णालय खर्च : ४ कोटी

आरोग्य संस्थांची संख्या : ४५

एकूण अंदाजे खर्च : १८०  कोटी