Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरी जाण्याच्या घाईत दोघांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 06:09 IST

मुंब्रा येथील मित्राला भेटून दोघे घराकडे निघाले. मात्र शेवटची लोकल चुकल्याचे समजताच त्यांनी घरी जाण्यासाठी मित्राची दुचाकी घेतली.

मुंबई : मुंब्रा येथील मित्राला भेटून दोघे घराकडे निघाले. मात्र शेवटची लोकल चुकल्याचे समजताच त्यांनी घरी जाण्यासाठी मित्राची दुचाकी घेतली. हीच गोष्ट त्यांच्या जिवावर बेतली. लवकर घरी जाण्याच्या घाईत लालबाग पुलावर शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात यासीन राजू खान (२५) आणि विजय चौधेकर (२०) या दोघांचा मृत्यू झाला.यासीन राजू खान आणिविजय चौधेकर हे दोघेही आग्रीपाडा येथील रहिवासी आहेत. खान हा मेकॅनिक म्हणून काम करायचा. गुरुवारी रात्री दोघेही मुंब्रा येथील मित्राला भेटायला गेले होते. तेथून निघताना रात्री उशीर झाला. त्यात अखेरची लोकल चुकल्यानेत्यांचा गोंधळ उडाला. घरी लवकर गेलो नाही तर कुटुंबीयांकडूनओरडा मिळेल, म्हणून त्यांनी मित्राच्या दुचाकीचा आधारघेतला आणि घरी लवकर जाण्याच्या नादात ते मुंब्रा येथून मुंबईच्या दिशेने दुचाकीवरून सुसाट निघाले.शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास लालबाग पुलावर आल्यावर गाडी वेगात असल्याने खानचे दुचाकीवरील नियंत्रणसुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यूझाला. भायखळा पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविलेआहेत.