Join us

BREAKING: माजी आरोग्य मंत्र्यांच्या गाडीला अपघात, डॉ. दीपक सावंत जखमी; कारला डंपरची धडक

By मनोहर कुंभेजकर | Updated: January 20, 2023 12:52 IST

अपघातात त्यांना मार लागला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 

मुंबई -

राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत हे आज सकाळी पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जात असताना काशिमीरा भागात त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात त्यांना मार लागला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 

डॉ. दीपक सावंत हे सकाळी पालघरच्या दिशेने जात असताना महामार्गावर काशिमीरा येथे त्यांच्या कारला डंपरने मागून जोरदार धडक दिली. त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली असून त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून त्यांना पोलिसांनी मुंबईत उपचारासाठी अँम्ब्युलन्सने पाठवले आहे.

टॅग्स :दीपक सावंत