कसारा : मुंबईहून इगतपुरीला सहलीसाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या बसला इगतपुरीहून परतत असताना अपघात झाला. त्यात आठ चिमुरड्यांसह दोन शिक्षिका जखमी झाल्या. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समधील ‘गुंदेचा एज्युकेशन अॅकॅडमी’ची शैक्षणिक सहल इगतपुरी येथील ‘मिस्टेक व्हॅली’ येथे गेली होती. बस ‘पेग्विंन हॉलीडेज’ या कंपनीची होती. परतीचा प्रवास करताना बसचालक भरधाव वेगात कसारा घाट उतरत होता. घाटाखालील ओहळाची वाडी या वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या ६ फूट खोल (नाला) खड्ड्यात कोसळली. या अपघातात प्रियंका तिवारी या शिक्षिकेसह अन्य एक शिक्षिका गंभीर जखमी झाल्या असून इजाज (वय २४,रा. बोरीवली), दक्ष कृपाल शाह (वय ८, बोरीवली),मनोज पारेख (८, बोरीवली), आर्यभान दिनेश भोसले (१२, बोरीवली), हर्ष संजीव कुमार (१२, बोरीवली), हिमांशु अग्रवाल (१२, बोरीवली), रिया जेकब (११, कांदिवली), साक्षी बसारिया (११, कांदिवली) हे विद्यार्थी जखमी झाले. जखमींवर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमपचार करण्यात आले. चालक पसार आहे. (वार्ताहर)शाळेने हात झटकलेसहल टूर आॅपरेटरने आयोजित केली होती. शाळेने केवळ माहिती दिली होती, असे गुंदेचा अॅकॅडमीचे म्हणणे आहे. पालकांच्या इच्छेनुसार ती नेली होती असे सांगण्यात आलेचिमुरड्यांचा आक्रोशअपघातग्रस्त ठिकाणी चिमुरड्यांचा आक्रोश सुरू होता. ‘बसमधून बाहेर काढा, बाहेर काढा’ असा आक्रोश मुले करीत होती. कसारा पोलीस, महामार्ग पोलीस व गॅमन हायवे गस्त पथकाने तसेच स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित मदतकार्य करीत अनेकांना जीवनदान दिले. १०८ या रुग्णवाहिकेमुळे त्वरित उपचार मिळाले. त्यामुळे पुढील आपत्ती टळली.
कांदिवलीतील शाळेच्या बसला कसाऱ्यात अपघात
By admin | Updated: December 31, 2014 01:42 IST