Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक्सप्रेस-वेवर कारला अपघात

By admin | Updated: October 3, 2014 01:09 IST

होंडा सिटी कारला एका लक्झरी बसने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर दोन प्रवासी जखमी झाले.

पनवेल : होंडा सिटी कारला एका लक्झरी बसने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर दोन प्रवासी जखमी झाले. मुंबई पुणो द्रुतगती महामार्गावर आदई पुलाजवळ गुरुवारी ही दुर्घटना घडली. खांदेश्वर पोलीस ठाण्यात याप्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणो कारमधील तीन महिन्यांची मुलगी सुदैवाने बचावली.
नेरूळ येथे राहत असलेले गौरव वर्मा आणि त्यांचे कुटुंबिय गुरुवारी सायंकाळी कामानिमित्त पुण्याला होंडा सिटीने चालले होते. आदई पुलाजवळ कार आली असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या लक्झरी बसने जोरदार धडक दिली. यात कारच्या पाठीमागे बसलेल्या शिवानी वर्मा (34) यांचा जागीच मृत्यु झाला. तर गौरव वर्मा आणि सासरे राजेंद्र वर्मा गंभीर जखमी झाले. त्यांना खांदा कॉलीनीतील अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 
दरम्यान या भीषण अपघातात सुदैवाने बचावलेली तीन महिन्यांच्या मुलीला कृष्णा नर्सिग होममध्ये ठेवले आहे. (वार्ताहर)