डोंबिवली : कल्याण स्थानकात अमरावती एक्स्प्रेसचा डबा घसरून झालेला अपघात हा रेल्वे रुळाला तडा गेल्याने (ट्रॅक प्रॅर) झाल्याचे मध्य रेल्वेच्या अधिका:यांनी सांगितले. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हवेतील उष्ण-थंड हवामानामुळे रुळांच्या आकुंचन-प्रसरण पावण्याच्या प्रक्रियेमुळे त्यास तडा जाण्याची शक्यता असते. अशाच तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे सांगण्यात आले. तरीही चौकशी सुरू असून निश्चित कारण त्यातून समोर येईलच, असेही संबंधित अधिका:यांनी स्पष्ट केले.
अपघातानंतर गाडय़ांच्या अनिश्चित वेळापत्रकामुळे सकाळच्या वेळेत कसारामार्गे मुंबईला येणा:या प्रवाशांना ठिकठिकाणी खोळंबून राहावे लागले. आसनगाव, खर्डी स्थानकांत तुडुंब गर्दी उसळली. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याचे शहापूरचे प्रवासी जितेंद्र विशे आणि उंबरमाळीचे राजेश घनघाव यांनी सांगितले. घटना घडल्यानंतर अल्पावधीतच वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी आल्याने मदतकार्यासह अन्य कामे वेगाने झाली. या सर्व कामांमध्ये वरिष्ठ स्वत:ही सहभागी झाल्याने प्रवाशांनीही शांततेचे धोरण स्वीकारत हवे ते साहाय्य करण्याची भूमिका घेतली होती. (प्रतिनिधी)
चौकशीचे आदेश
या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतरच हा अपघात कसा झाला, याबाबत भाष्य करणो उचित होईल, असे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले. तर प्रवाशांना झालेल्या त्रसाबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.
याबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांना ऑक्टोबर महिन्यात होणा:या अपघातांबाबत विचारले असता फक्त पाच अपघात झाल्याचे सांगितले. मध्य रेल्वे विस्कळीत होऊ नये यासाठी काही प्लॅनिंग करत असून शनिवारीही ब्लॉक घेण्याचा विचार करत आहोत. हा ब्लॉक यंदाच्या शनिवारपासूनही घेऊ शकतो, असे सूद म्हणाले.
गाडय़ांच्या
वेळापत्रकात बदल
1पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. राज्यराणी एक्स्प्रेस नाशिक रोडर्पयत चालविण्यात आली. भुसावळ-पुणो ही गाडी मनमाड-दौंड मार्गे वळविण्यात आली.
2सीएसटी-हावडा व्हाया अलाहाबाद ही गाडी सीएसटीहून रात्री 9.3क् ला सुटण्याऐवजी रात्री 11.25 ला सुटेल. सीएसटी-राजेंद्रनगर ही गाडी रात्री 11.25 ऐवजी मध्यरात्री 1.3क् ला सुटेल. सीएसटी वाराणसी महानगरी ही गाडी रात्री 1क् ला सुटण्याऐवजी मध्यरात्री 1 वा. सुटेल.
3या सर्व घटनेत अप/डाऊन मार्गावरील तब्बल 63 उपनगरीय लोकल गाडय़ा रद्द करण्यात आल्याचेही जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले असून गुरुवारी रात्री उशिरार्पयत मध्य रेल्वेचे वेळापत्रक 2क्/25 मिनिटे विलंबाने धावणार असल्याचे सांगण्यात आले.
ऑक्टोबर महिन्यात मध्य रेल्वेची रडगाथा सुरूच
मुंबई : कल्याणजवळ मुंबईच्या दिशेने येणा:या अमरावती एक्स्प्रेसचे इंजीन आणि एक डबा रुळावरून घसरला आणि मध्य रेल्वे कोलमडली. सकाळी कामावर जाणा:या चाकरमान्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र मध्य रेल्वेची ही रडगाथा संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात सुरूच राहिली असून तब्बल दहा वेळा मध्य रेल्वेची मेन लाइन आणि हार्बर कोलमडली आहे.
25 ऑक्टो. : आसनगावजवळ मालगाडीचे इंजीन फेल
26 ऑक्टो. : हातिया एक्स्प्रेसच्या एसी डब्याला एलटीटी यार्डत आग
26 ऑक्टो. : कर्जत लोकलमध्ये बदलापूर आणि वांगणीमध्ये बिघाड
27 ऑक्टो. : वासिंद-आसनगाव दरम्यान लोकलमध्ये बिघाड
28 ऑक्टो. : तुर्भेजवळ सिग्नलमध्ये बिघाड. ट्रान्स हार्बर कोलमडली
29 ऑक्टो. : कळवा कारशेडमधील विद्युत पुरवठय़ावर परिणाम. 18 सेवा रद्द
29 ऑक्टो.: डोंबिवली स्थानकाजवळ अप जलद मार्गावर रुळाला तडा.
30 ऑक्टो.: अमरावती एक्स्प्रेसचे इंजीन व एक डबा कल्याणजवळ घसरला.