Join us  

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मित्राला एसीबीकडून अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 6:09 AM

खार येथील राहत्या घरातून करण्यात आली अटक.

ठळक मुद्देखार येथील राहत्या घरातून करण्यात आली अटक.

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा हॉटेल व्यावसायिक मित्र कुणाल जानी याला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) गुरुवारी अटक केली. अभिनेता अर्जुन रामपालच्या मैत्रिणीचा भाऊ अँजिसिलिओस डिमेट्रिडेसशी संबंध असल्याच्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याने त्याला खार येथील निवासस्थानातून अटक करण्यात आली आहे, असे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

अँजिसिलिओस डिमेट्रिडेसला ड्रग्जसंबंधी मागच्या आठवड्यात गोव्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याशी आपला कसलाही संबंध नसल्याचे अर्जुन रामपालने स्पष्ट केले. तर हॉटेल व्यवसायिक कुणाल जानीकडे गेल्या वर्षी एनसीबीने कसून चौकशी केली होती. 

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअमली पदार्थअटकअर्जुन रामपाल