Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्स हार्बर मार्गावर जानेवारी अखेरीपर्यंत एसी लोकल धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 01:53 IST

ट्रान्स हार्बर मार्गावर जानेवारी अखेरीपर्यंत एसी लोकल धावणार आहे.

मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावर जानेवारी अखेरीपर्यंत एसी लोकल धावणार आहे. या मार्गावरील प्रवाशांना थंडगार प्रवासाचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी गुरुवारी सीएसएमटी येथे दिली. पुढील आठवड्यात एसी लोकलची अंतिम चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर ही एसी लोकल ठाणे ते वाशी, ठाणे ते नेरूळ, पनवेल धावेल, अशी माहिती संजीव मित्तल यांनी दिली. अनेक कालावधीपासून मध्य रेल्वेमार्गावर एसी लोकल धावण्यासाठी तांत्रिक अडथळे येत होते. एसी लोकलचा मार्ग रेल्वेरूळ मार्गावरील पुलांनी अडविला आहे. एसी लोकलची उंची जास्त आहे. परिणामी एसी लोकल चालविणे कठीण आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील धावणाऱ्या एसी लोकलपेक्षा मध्य रेल्वेमार्गावरील एसी लोकलची उंची १३ मिमीने कमी करण्यात आली आहे. भेलद्वारे लोकलची बांधणी केली आहे़