Join us

अबू सालेम पुन्हा बोहल्यावर चढण्यास उत्सुक

By admin | Updated: June 30, 2015 01:22 IST

अभिनेत्री मोनिका बेदीसोबत विवाह करून सतत चर्चेत राहिलेला गँगस्टर अबू सालेम पुन्हा बोहल्यावर चढण्यास उत्सुक आहे. मुंब्य्रातील एका मुलीशी आता अबू विवाह करणार आहे.

मुंबई : अभिनेत्री मोनिका बेदीसोबत विवाह करून सतत चर्चेत राहिलेला गँगस्टर अबू सालेम पुन्हा बोहल्यावर चढण्यास उत्सुक आहे. मुंब्य्रातील एका मुलीशी आता अबू विवाह करणार आहे. तसा अर्जच त्याने विशेष टाडा न्यायालयात सोमवारी केला.ही तीच मुलगी आहे जिच्या सोबत गेल्या वर्षी धावत्या मेल गाडीत अबूने विवाह केल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने याची चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र या घटनेमुळे खूप बदनामी झाली आहे. कुटुंबात व वास्तव्य करत असलेल्या विभागात जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे अबूसोबत विवाहास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज त्या मुलीने विशेष टाडा न्यायालयात केला.त्याचे प्रत्युत्तर सादर करताना अबूनेही या विवाहास होकार दिला. त्या मुलीची माझ्यामुळे खूप बदनामी झाली आहे. तिला समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी मी तिच्याशी विवाह करणार आहे, असे अबूने न्यायालयाला कळवले आहे. त्यामुळे आता न्यायालय या विवाहास कधी व कशी परवानगी देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)