Join us  

विधि अधिकारी नसल्याने बलात्काराचा तपास रखडला, जबाब नोंदवून अडीच महिने उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 2:00 AM

मुंबई : गुंगीचे पदार्थ मिसळलेले शीतपेय पाजून बेशुद्धावस्थेत असलेल्या विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या अतुल कदम या आरोपीचा जबाब नोंदवून अडीच महिने उलटले तरी अद्याप दिंडोशी पोलिसांकडून अटकेची कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबई : गुंगीचे पदार्थ मिसळलेले शीतपेय पाजून बेशुद्धावस्थेत असलेल्या विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या अतुल कदम या आरोपीचा जबाब नोंदवून अडीच महिने उलटले तरी अद्याप दिंडोशी पोलिसांकडून अटकेची कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उत्तर प्रादेशिक विभागात विधि अधिकारी नसल्याने हा विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे.आरोपीने केलेल्या बलात्काराचे चित्रीकरण करून ते प्रसारित करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून अतुल कदम या मेकअप आर्टिस्टविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपीने आपली अश्लील छायाचित्रे नातेवाइकांना पाठवल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. १५ आॅगस्ट रोजी पोलिसांनी आरोपीचा जबाब नोंदवला.उत्तर प्रादेशिक विभागात गेल्या तीन वर्षांपासून विधि अधिकारीच नसल्याने आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हे प्रकरण अभिप्रायासाठी उत्तर पश्चिम प्रादेशिक विभागाच्या विधि अधिकाºयाकडे पाठवण्यात आले. त्यांनी आरोपीला अटक करण्यापूर्वी याबाबत संबंधित पोलीस उपायुक्तांना कळवण्यात यावे, असा शेरा मारून एक महिन्याने कागदपत्रे परत केली. त्यानंतर ३ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यातआला.तीन मुले असलेली पीडित महिला शैला (बदललेले नाव) ही गेल्यानऊ वर्षांपासून गोरेगाव फिल्म इंडस्ट्रीत हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करते. पती व्यसनी असल्याने २०१६पासूनती माहेरी राहते. एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर आपली आरोपी अतुल कदम याच्याशी ओळख झाली. मेकअपमन असल्याने त्याने आपल्याला अनेक अभिनेत्रींचे हेअर स्टायलिस्ट म्हणून काम दिले. कामाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी २०१४ रोजी आरोपीने आपल्याला त्याच्या गोरेगाव (पूर्व) येथील नागरी निवारा परिषदेतील घरी बोलावले आणि शीतपेयात गुंगीचे पदार्थ मिसळून बेशुद्धावस्थेत असताना आपल्यावर बलात्कार केला, असे तक्रारदार महिलेने जबाबात नमूद केले आहे. त्यानंतर मोबाइलमध्ये असलेली अश्लील छायाचित्रे आणि चित्रीकरण दाखवून आरोपीने बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याला विरोध केला असता आपली अश्लील छायाचित्रे सासू - सासरे तसेच मित्रमैत्रिणींना पाठवली, असे तक्रारीत म्हटले आहे.>पुरावा हाती असतानाही कारवाई का नाही?आरोपीला पोलीस ठाण्यात बोलावले असता त्याने अश्लील छायाचित्रे काढलेली सीडी, पेन ड्राइव्ह आणि आल्बम पोलिसांकडे सादर केलाची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.पुरावा हाती असतानाही पोलिसांनी अटकेची कारवाई का केली नाही, असा सवाल राष्ट्रीय अपराध आणि भ्रष्टाचार निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी केला आहे.

टॅग्स :विनयभंग