Join us
Daily Top 2Weekly Top 5

वंध्यत्वाच्या विळख्यात ३० ते ३५ वयातील ५४% महिला

By admin | Updated: March 10, 2015 00:48 IST

काही वर्षांपूर्वीपर्यंत मुलींच्या लग्नाचे वय हे २१ ते २३ वर्षे इतके होते. पण गेल्या काही वर्षांत मुलींच्या लग्नाचे वय वाढले असून आता तिशीपर्यंत

मुंबई : काही वर्षांपूर्वीपर्यंत मुलींच्या लग्नाचे वय हे २१ ते २३ वर्षे इतके होते. पण गेल्या काही वर्षांत मुलींच्या लग्नाचे वय वाढले असून आता तिशीपर्यंत आणि त्याच्या पुढे गेले आहे. शहरीकरणामुळे स्वीकारलेल्या जीवनपद्धतीमुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असून ३० ते ३५ वयोगटातील ५४ टक्के महिला वंध्यत्वाच्या विळख्यात आहेत. तर याच वयोगटातील ७.०८ टक्के महिलांच्या वंध्यत्वाच्या चाचणीचा अहवाल सदोष आल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत २१ ते ४० वयोगटातील २९ हजार ६२१ महिलांची वंध्यत्वाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४ हजार ८०७ महिलांचा तपासणी अहवाल वंध्यत्व रेषेच्या खाली आल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. ३० ते ३५ वयोगटातील ६ हजार ९४१ महिलांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ३ हजार ११८ महिलांचा चाचणी अहवाल वंध्यत्व रेषेच्या खाली आला होता. म्हणजे या महिलांना वंध्यत्वाचा धोका अधिक आहे. ३५ ते ४० वयोगटातील ७ हजार ४९३ महिलांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. यापैकी ३ हजार ७७२ महिलांचा अहवाल हा वंध्यत्व रेषेखाली आला आहे.