Join us

फरार खंडणीखोर गजाआड

By admin | Updated: February 16, 2015 05:04 IST

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडून २० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन आरोपींना भांडुप पोलिसांनी अटक केली.

भांडुप : ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडून २० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन आरोपींना भांडुप पोलिसांनी अटक केली. यातील फरार आरोपी अनिल जयस्वाललाही भांडुप पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा गजाआड केले. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे शरीफ पठाण शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास भांडुप लालबहादूर शास्त्री मार्गावरून रेती घेऊन जात होते. अटक आरोपी दत्तात्रय मनाले (२६), सचिन सावंत (३२) या दोघांनी त्यांना वाटेत गाठले. त्यांच्याकडे २० हजारांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच ठार मारण्याची धमकी देत त्यांना बाईकवर मध्यभागी बसवून त्यांंचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. नाकाबंदीदरम्यान भांडुप पोलिसांनी मनाले आणि सावंतला अटक केली. जयस्वालने मात्र पळ काढला. शनिवारी रात्री उशिरा भांडुप पोलिसांनी सापळा रचून अनिलला भांडुपमधूनच अटक केली. (प्रतिनिधी)