Join us

आश्रमशाळा हल्ला प्रकरणी दामले फरार

By admin | Updated: June 5, 2015 01:13 IST

बदलापूरजवळील एका आश्रमावर घातलेल्या दरोड्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक कॅप्टन आशीष दामले हा फरार असला तरी या प्रकरणातील त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

बदलापूर : बदलापूरजवळील एका आश्रमावर घातलेल्या दरोड्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक कॅप्टन आशीष दामले हा फरार असला तरी या प्रकरणातील त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी दामले याच्या दोन्ही अंगरक्षकांना निलंबित केले आहे. हे दोन्ही पोलीस दरोड्याच्या वेळी घटनास्थळी होते. दामलेने बदलापूरपासून जवळ असलेल्या इंदगावमध्ये नरेश रत्नाकर यांच्या साधना भवन या आश्रमात मंगळवारी रात्री ११ वाजता १० ते १५ कार्यकर्त्यांसह घुसून तोडफोड व मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. सर्व प्रकार आश्रमातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंदिस्त झाल्याने दामले याच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी अद्यापही तो पोलिसांकडे हजर झालेला नाही. कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्याचा तो प्रयत्न करीत आहे. त्याचा साथीदार प्रशांत जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेच्या दिवशी जाधव हा दामलेसोबत आश्रमात गेला होता.दोन पोलीस अंगरक्षकांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने मयूर गायकवाड व अनिस शेख यांनादेखील ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयातून निलंबित केले आहे.