मनोर : येथील दहिसर तर्फे मनोर ग्रामपंचायत हद्दीत कुडे गावात संत तलावात 9 फुटी अजगर जाळ्यामध्ये अडकला होता. त्याला सर्प मित्र महेंद्र रघुनाथ गोवारी यांनी पकडून वनखात्याचे अधिका:यांच्या ताब्यात दिले. त्यांनी त्या अजगराला सुखरूप दहिसरच्या जंगलात सोडले.
जंगलातील वृक्ष झाडे झुडपे नष्ट होत असल्याने वन्यप्राण्यांना भक्ष मिळत नसल्याने वाघ, अजगर सारखे प्राणी आपली पोटाची खळगी भरण्यासाठी गावा शेजारी येवू लागले. त्यामुळे जंगलाच्या बाजुला असलेले गावातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या वर्षी चिल्हार येथे कांता गुरोडा माजी जि. प. सदस्य यांच्या शेतामध्ये अजगर सापडला होता. यावर्षी 15 सप्टें. रोजी कुडे गावात शेत तलावामध्ये जाळ्यामध्ये 9 फुटी लांब असलेला अजगर सापडला. त्यास सर्प मित्रने पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. असे अनेक प्राणी आता गावाशेजारी निदर्शनात येवू लागले आहेत. वन विभागाने आता घातक प्राणी गावात येवू नये म्हणून गावाचे आजुबाजूला संरक्षक भिंत बनवावी. (वार्ताहर)