सदानंद नाईक ल्ल उल्हासनगर
उल्हासनगर पुर्वेची विभागणी अंबरनाथ व कल्याण पुर्वे मतदारसंघात झाली असुून पुर्वेला दोन आमदार मिळुनही विकास कामे ठप्प पडली आहे. सव्वा दोन लाख मतदारांना वा-ंयावर सोंडणा-ंया आमदारान्ां मतदारराजा धडा शिकविणार असल्याची चर्चा रंगली आहे.
उल्हासनगर शहराचे विभाजन तीन मतदार संघात झाल्याने शहरात मोठया प्रमाणात विकासात्मक कामे उभी राहणार असल्याचे बाबले जात होते. शहरातील कॅम्प नं-1,2 व 3 परिसर उल्हासनगर मतदारसंघात तर पुव्रेचा भाग अंबरनाथ व कल्याण पुर्व मतदारसंघात विभाजन झाले आहे. आमदार बालाजी किणीकर व आमदार गणपत गायकवाड यांनी गेल्या 5 वर्षात शहरात कुठे आमदार निधी वापरला याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
शहराच्या पुर्व भागात व्हिटीसी व दसरा मैदाने असुन मैदानाची दुरावस्था झाली आहे. दसरा मैदानाच्या मधोमध तर स्थानिक झोपडपटृटीतुन सांडपाण्याची नाली काढण्यात आल्याने मैदान दलदलीचे ठिकाण झाले आहे. तर बहुंताश रस्त्याच्याची दुरावस्था झाली असुन नेताजी चौकातील रस्ता खड्डयात कि खड्डयात रस्ते अशी स्थिती झाली आहे. तसेच परिसरातील एकमेव नेताजी गार्डनीची दुरावस्था झाली आहे. गार्डन मधिल सर्व लहान मुलाची खेळणी निकामी झाली असुन खेळने बसविण्या इतपत महापालिका स्थानिक आमदारा जवळ निधी नसल्याची टिका होत आहे.
भाटिया चौकात सिंधी समाजाचे संत स्वामी शांतीप्रकाश यांचा पुर्णाकृती पुतळा असुन पुतळया शेजारील रस्त्याला खड्डयाचा महापुर आला आहे. पाणी टंचाई नेहमीची झाली असुन ऐण पावसाळयात महिलेवर पिण्याच्या एका हंडयासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. तसेच कॅम्प नं-4 व 5 परिसरातील नागरीकांच्या सोयी साठी बांधण्यात आलेल्या भाजी मंडईवर भुमाफियांनी अतिक्रमण केल्याने भाजी बाजार भर रस्त्यावर भरत आहे. भाजी मंडई प्रमाणो कॅम्प नं-5, परिसरातील मटन व मासे बाजार भर रस्त्यावर भरून बकं-या-कोंबळयाची कत्तल खुलेआम रस्त्यावर होत आहे.
देशातील दोन क्रमांकाचा जिन्स उघोगाला राजकिय इच्छाशक्तीमुळे घरघर लागली असुन जिन्स कारखाना परिसर गुन्हेगारीचे माहेर घर झाले आहे. कारखान्यातील अॅसिडयुक्त विषारी सांडपाणी उघडया नालीत टाकण्यात येत असल्याने जीवघेणो प्रदुषन झाले आहे.