Join us

अबब ! स्वयंपाक घरात शिरला साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:07 IST

foto aaheलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालाडच्या मालवणी परिसरातील स्वयंपाक घरात साप शिरल्याने खळबळ उडाली. मात्र सर्पमित्राने वेळीच ...

foto aahe

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरातील स्वयंपाक घरात साप शिरल्याने खळबळ उडाली. मात्र सर्पमित्राने वेळीच घटनास्थळी धाव घेत सापाला पकडून नंतर वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.

मार्वे रोड परिसरात ऐन संक्रांतीच्या दिवशी एक साप घरात शिरला. घरच्यांना ही बाब समजली आणि त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. जे पाहून साप घरातील भांड्यांच्या मागे जाऊन लपला. त्यामुळे त्याला शोधणे कठीण झाले आणि घराबाहेर जमलेल्या स्थानिकांपैकी एकाने याबाबत सर्पमित्र तन्मय जोशी यांना कळविले. जोशी यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सावधानतेच्या सूचना देत सापाचा शोध घेण्यास सुरुवात केली. एका डब्याच्या मागून कोब्राला पकडण्यात जोशी यांना यश मिळाले आणि याची माहिती त्यांनी वनविभागाला दिली. त्याला जंगलात सोडून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.