Join us

आरेत पाच वर्षीय मुलीवर बलात्कार

By admin | Updated: March 3, 2015 02:49 IST

एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची घटना आज, सोमवारी गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये घडली. या मुलीचे अंधेरीच्या सहार परिसरातून अपहरण केले होते.

मुंबई : एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची घटना आज, सोमवारी गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये घडली. या मुलीचे अंधेरीच्या सहार परिसरातून अपहरण केले होते. या प्रकरणी आरे पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, हे प्रकरण सहार पोलिसांकडे वर्ग केले आहे.अनू (नावात बदल) ही मुलगी सहार परिसरात कुटुंबासोबत राहते. रविवारी सायंकाळी तिच्या आईने तिला दुकानातून दूध आणण्यासाठी पाठवले होते. मात्र बराच वेळ झाला तरी अनू घरी परतली नाही. म्हणून तिच्या घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. मात्र अनू कुठेच सापडली नाही. अखेर ती हरवल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी सहार पोलीस ठाण्यात नोंदवली. दरम्यान, क्र ाइम ब्रँच कक्ष ९ चे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश वंझारे हे घाटकोपरहून दुचाकीवरून त्यांच्या घरी परतत होते. त्या वेळी त्यांना रडण्याचा आवाज आला. त्यांनी गाडी थांबवून पाहिले, तेव्हा त्यांना अनू दिसली. त्यांनी विश्वासात घेऊन अनूकडून माहिती घेतली. तेव्हा रिक्षावाल्या काकांनी मला येथे सोडल्याचे तिने सांगितले. तिच्यासोबत काही तरी गैरकृत्य घडल्याचा अंदाज वंझारे यांना आला. क्षणाचाही विलंब न करता वाघमारे यांनी अनूला सोबत घेत रिक्षाचा शोध सुरू केला. त्यांनी आरे मार्गावरील तीन-चार रिक्षावाल्यांना थांबवून अनूला त्यांना ओळखण्यास सांगितले. मात्र त्यापैकी कोणीही नसल्याचे अनूने सांगितले. अखेर वंझारेंनी तिला आरे पोलिसांच्या स्वाधीन केले आणि पोलीस नियंत्रण कक्षावर हरवलेली मुलगी सापडल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)कूपरमध्ये तपासणीअनूची स्थिती फारच गंभीर असल्याने आरे पोलिसांनी तिला वैद्यकीय चाचणीस कूपर रुग्णालयात पाठविले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले.